Type Here to Get Search Results !

नवरात्रीच्या सातव्या माळेनिमित्त प्रशासनातील महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या नऊ नवदुर्गां’नी घेतले येडाईचे दर्शन



तेरणा काठ वृत्तसेवा -- नवरात्रोत्सवातील सातव्या माळेला महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांतील नऊ महिला उपजिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी ता.18 रोजी सायंकाळी सहा वाजता येरमाळा येथील श्री.येडेश्वरी देवीचे दर्शन घेतले. प्रशासनातील महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या या नऊ महिला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे.देवीच्या भक्तीबरोबरच कर्तृत्व,नेतृत्व आणि सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडविणारा योग घडून आला.

नवरात्र म्हणजे केवळ धार्मिक विधी, उपवास आणि घटस्थापनेचा उत्सव नव्हे,तर स्त्रीच्या सामर्थ्याचा,स्वाभिमानाचा आणि कर्तृत्वाचा गौरव करणारा सांस्कृतिक जागरही आहे.घरापासून समाजापर्यंत आणि प्रशासनापासून नेतृत्वापर्यंत महिलांनी विविध क्षेत्रांत उमटविलेला ठसा हा या स्त्रीशक्तीचाच आधुनिक आविष्कार मानला जातो.

महाराष्ट्रातील नऊ वेगवेगळ्या जिल्ह्यांत प्रशासकीय जबाबदारी सांभाळणाऱ्या नऊ महिला उपजिल्हाधिकाऱ्यांनी नवरात्रीच्या सातव्या माळेला श्री.येडेश्वरी देवीचे दर्शन घेतल्याने  श्री.येडेश्वरी देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments