Type Here to Get Search Results !

जनता सहकारी बँकेची कळंब शाखा नव्या इमारतीत सुरू



तेरणा काठ वृत्तसेवा -- जनता सहकारी बँक, धाराशिवच्या कळंब शाखेचे सोमवारी (दि. १९) नव्या इमारतीत स्थलांतर करण्यात आले. 

कळंब येथे बाजार मैदान रोडवरील पटेल कॉम्प्लेक्समध्ये बँकेची शाखा सुरू झाली.बँकेचे अध्यक्ष वसंतराव संभाजीराव नागदे यांच्या हस्ते रिबीन कापून नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी उपस्थित सभासद आणि ग्राहकांना संबोधित केले. बँकेच्या कामकाजाची माहिती देतानाच ग्राहकांना चांगली सेवा देण्यावर भर देण्यात आला.या कार्यक्रमाला बँकेचे संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सभासद, ठेवीदार आणि कर्जदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन शाखा अधिकारी राजकुमार बांगर यांनी केले.

Post a Comment

0 Comments