Type Here to Get Search Results !

ग्रामीण वुमन ट्रस्टच्या वतीने तेर येथे शिवणकाम प्रशिक्षणाचा समारोप प्रमाणपत्र वाटपाने उत्साहात संपन्न



 तेरणा काठ वृत्तसेवा --- धाराशिव तालुक्यातील तेर येथे ग्रामीण वुमन ट्रस्ट धाराशिव यांच्या अंतर्गत सना शेख यांच्या माध्यमातून शिवणकाम प्रशिक्षणाला थाटामाटात सुरुवात झाली. या प्रशिक्षणात प्रशिक्षक तब्बसुम शेख यांनी महिलांचे ड्रेस, साड्यांचे डिझाईन, साधे ब्लाऊज, परकर,कटोरी ब्लाऊज असे विविध प्रकारचे डिझाईन महिलांना शिकवण्यात मोलाचा वाटा उचलला आणि त्यांना व्यावसायिक प्रशिक्षणही दिले.

 *या शिवणकामाचा समारोप रविवार दिनांक 4.10.2026 रोजी तेरे येथील उर्दू शाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास धाराशिवचे माजी नगराध्यक्ष मैनुद्दीन पठाण, ग्रामपंचायत सदस्य बबलू मोमिन, हर्षद मुलांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते नाशिर काझी तोफिक काझी, विलास वकील आणि फरीद शेख हे उपस्थित होते. तर मार्गदर्शक म्हणून ग्रामीण वुमन ट्रस्टचे संस्थापक पांडुरंग घोडके उपस्थित होते.. प्रशिक्षण समारोप प्रसंगी 30 महिलांना उषा कंपनी अंतर्गत देण्यात येणारे शिवणकामाचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.*

 *यावेळी बोलताना मैनुद्दीन पठाण यांनी शासनाच्या विविध योजनेची माहिती सांगितली तसेच विलास वकील यांनी कापडी पिशव्या परकर सारखा लहान व्यवसाय आपण करू शकता याबद्दल मार्गदर्शन केले तर मिळालेल्या प्रमाणपत्राच्या नंतर पुढे व्यवसाय वाढविण्यासाठी कर्ज प्रकरणे तसेच बचत गटाचे माध्यमातून महिलांचे संघटन आणि मार्केटिंग याबद्दल पांडुरंग घोडके यांनी सविस्तर माहिती सांगितली या प्रशिक्षण समारोप कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अविरतपणे कार्य करणाऱ्या सना शेख यांनी मांडले. याप्रसंगी अनेक प्रशिक्षित महिलांनी सकारात्मक आणि यशस्वी वाटचालीच्या दृष्टीने उत्तम अशा प्रतिक्रिया दिल्या तर हा कार्यक्रम यशस्वीपणे उत्साहात संपन्न झाला..*

Post a Comment

0 Comments