Type Here to Get Search Results !

आळणीत सोयाबीन पीक कापणी प्रयोग; तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांची उपस्थिती



तेरणा काठ वृत्तसेवा : धाराशिव तालुक्यातील आळणी येथे सोयाबीन पिकाचा पीक कापणी प्रयोग घेण्यात आला. तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या उपस्थितीत कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात कापणी करून उत्पादनाचे वजन व नोंद केली. त्यामुळे संबंधित क्षेत्रातील सोयाबीन उत्पादनाची प्रत्यक्ष आकडेवारी संकलित करण्यात आली.

आळणी येथील शेतकरी गोवर्धन पांडुरंग भड यांच्या गट क्रमांक ३५५ मधील ०.४४ हेक्टर क्षेत्रावर हा प्रयोग घेण्यात आला. यामध्ये KDS-612 या सोयाबीन वाणाचा समावेश होता. निर्धारित पद्धतीनुसार पिकाची कापणी केल्यानंतर त्याचे वजन करण्यात आले. नोंदीनुसार कडब्याचे वजन १६.६४ किलो, तर धान्याचे वजन २.७८० किलो इतके नोंदविण्यात आले.



पीक कापणी प्रयोगावेळी उपकृषी अधिकारी डी.पी. मोहिते, सहायक कृषी अधिकारी श्रीमती एस.पी. काळे, मंडळ अधिकारी डी.डी. मुलुक, ग्राम महसूल अधिकारी व्ही.जे. शिंदे, माजी उपसरपंच संतोष चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.अधिकाऱ्यांनी पिकाची पाहणी करून कापणी, वजन व नोंदणीची प्रक्रिया प्रत्यक्ष पाहिली. पीक कापणी प्रयोगातून शेतातील प्रत्यक्ष उत्पादनाची वस्तुनिष्ठ माहिती संकलित केली जाते. आळणी येथील प्रयोगाची कार्यवाही संबंधित अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली.

Post a Comment

0 Comments