Type Here to Get Search Results !

श्री येडेश्वरी देवी मंदिरात ११ ऑक्टोबरपासून नवरात्र महोत्सवास प्रारंभ



तेरणा काठ वृत्तसेवा --- येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवी मंदिरात नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.नवरात्र महोत्सवाची सुरुवात रविवार, ११ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता मानकऱ्यांच्या हस्ते घटस्थापनेने होणार आहे. उत्सवाच्या काळात दररोज पहाटे ५.३० वाजता व रात्री ८.३० वाजता पंचोपचार पूजा व आरती होणार आहे. दररोज देवीची विविध रूपांमध्ये पूजा करण्यात येणार असून यामध्ये नागवेलीची, एकवेलीची, दोनवेलीची, चंद्राची, मोराची, आकड्याची, नारळाची, साखळीची, वाघाची आणि बारावाची अशा विविध पूजा राहणार आहेत.तसेच वेगवेगळ्या गावांतील भजनी मंडळांकडून धार्मिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. यामध्ये ११ ऑक्टोबर रोजी येरमाळा व बाभळगाव, १२ रोजी उमरा, दुधाळवाडी व सटवाईवाडी, १३ रोजी पानगाव, मलकापूर व बारातेवाडी, तर १४ रोजी नागझरवाडी व कडकनाथवाडी येथील भजनी मंडळांचा सहभाग राहणार आहे.१५ ऑक्टोबर रोजी शेलगाव येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम असून, रात्री छबिना काढण्यात येणार आहे. १६ रोजी कसबे तडवळे व परतापूर, १७ रोजी कन्हेरवाडी व उक्कडगाव, तर १८ रोजी बांगरवाडी व उपळाई येथील भजनी मंडळांचा सहभाग राहणार आहे.

१९ ऑक्टोबर रोजी महाष्टमी निमित्त उत्तररात्री होमास प्रारंभ होईल. २० ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी होम-बलिदान, पूर्णाहुती व पारणे होणार असून, सायंकाळी ५ वाजता सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होणार आहे.  १९ ऑक्टोबर रोजी महाष्टमी निमित्त उत्तररात्री होमास प्रारंभ होईल. २० ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी होम-बलिदान, पूर्णाहुती व पारणे होणार असून, सायंकाळी ५ वाजता सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होणार आहे.तसेच २६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पालखीसह छबिना रात्री ९ वाजता काढण्यात येणार आहे. या धार्मिक सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी रहावे असे आवाहन श्री येडेश्वरी देवस्थान मंदिर ट्रस्टच्या  वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments