तेरणा काठ वृत्तसेवा --- शेतकऱ्यांना पोळा साजरा करताना जनावरांना साज चढवून नटवणे हा उत्सव असल्याने या मुख्य दिनाचे औचित्य साधून येरमाळा दूध डेअरी सोसायटीच्या वतीने जनावरांसाठी साज वाटप करण्यात आले.
वर्षभरातून एकदा येणाऱ्या पोळा सण हा उत्सवांची पर्वणी असते.या दिवशी सकाळी आपल्या गायी म्हशी व बैलांची पूजा करतात.त्यांना न्हाऊन धुवून पुसून घेतात व त्यांच्या अंगावर साज चढवला जातो त्यांना सजवले जाते यामध्ये नवीन म्होरक्या ,चंगळ्या,घाटी मोरपीस झुली परिधान करून संध्याकाळी वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढण्यात येते.अशा या उत्सवाला येरमाळा दुध डेअरी च्या वतीने शेतकऱ्यांना व दुग्धव्यवसायिकांना साज डेअरीचे चेअरमन प्रा. अंकुशराव पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी सचिव बाबासाहेब मोहनराव बारकुल , सचिन घेवारे, संतोष कोकाटे यांच्यासह शेतकरी बांधव व दूध उत्पादक उपस्थित होते

Post a Comment
0 Comments