Type Here to Get Search Results !

श्री नृसिंह गणेश मंडळाच्या वतीने लेझीम, टिपरी, टाळपथक या पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप



तेरणा काठ वृत्तसेवा -- येरमाळा येथील श्री नृसिंह गणेश मंडळांच्या वतीने गेल्या तेरा वर्षांपासून सुरू असलेली गणेशोत्सवाची सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनाची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात जपण्यात आली. अकरा दिवस विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांनी उत्सवाची रंगत वाढल्यानंतर श्री गणरायाला पारंपरिक पद्धतीने वाजत-गाजत भावपूर्ण निरोप देण्यात आला.

गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मंडळाच्या सदस्यांनी लेझीम, टिपरी, टाळपथक तसेच पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक एकता, बंधुभाव, एकोपा आणि समाजप्रबोधनाचे संदेश देण्यात आले. विशेष म्हणजे महिलांच्या टाळपथकानेही मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग घेतला.

मिरवणुकीसाठी रथाची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. या रथामध्ये तिरुपतीचा देखावा साकारण्यात आला होता. 

श्री नृसिंह गणेश मंडळ हे केवळ गणेशोत्सव साजरा करणारे मंडळ न राहता गेल्या तेरा वर्षांपासून संस्कृती, सामाजिक एकता, शिक्षण आणि समाजप्रबोधनाची परंपरा जपत आहे. गणेशोत्सवाच्या अकरा दिवसांच्या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम, स्पर्धा आणि सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. लहान बालगोपालांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.सर्वधर्मसमभाव, सामाजिक ऐक्य आणि एकोप्याचा संदेश देत समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे काम मंडळाच्या माध्यमातून सातत्याने केले जात आहे. त्यामुळे येरमाळा परिसरातील नागरिकांचा गणेशोत्सवातील सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे.

या उत्सवाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष विशाल बारकुल, उपाध्यक्ष  तेजस बारकुल, सचिव  दीपक बारकुल तसेच बालाजी जाधव, आदित्य मोरे  महेश बारकुल, समाधान बारकुल, गणेश बारकुल, लखन मोरे, अल्ताफ पठाण,  रामेश्वर चौधरी, आकाश बारकुल, आतिश बारकुल, अविनाश मोरे यांच्यासह मंडळाच्या सर्व सदस्यांनी केले. मंडळाचे मार्गदर्शक  अमोल बारकुल सर, गोरखनाथ बारकुल तसेच ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गणेशोत्सव यशस्वीपणे पार पडला.. सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी गर्दी केली होती आणि सर्वांनी या मिरवणुकीचा आनंद घेतला

Post a Comment

0 Comments