तेरणा काठ वृत्तसेवा --- महसुल व वन विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णय क्र. मराअ-2025/प्र.क्र.27/समन्वय-1 दिनांक 14 ऑगस्ट 2026 अन्वये महात्मा जोतिराव फुले महसुल लोक अदालत अभियानांतर्गत राज्यात महसुल विभागांतर्गत प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे आपआपसातील तडजोडीने व सहमतीने निकाली काढण्यासाठी राज्यात दि.01 सप्टेंबर 2026 ते दि. 31 मार्च 2027 या कालावधीमध्ये महात्मा जोतिराव फुले महसुल लोक अदालत अभियान राबविण्यास आदेशित केलेले आहे. त्याअनुषंगाने महसूल प्रशासनातील अर्धन्यायीक महसूल दावे दाखल झालेनंतर विविध कारणामुळे प्रलंबित राहतात. त्यामुळे ब-याच वेळा पक्षकारांना न्याय मिळणेसाठी दिर्घकाळ प्रतिक्षा करावी लागते त्यांनतर दाव्याचे निकाल दिले जातात तेव्हा एका पक्षाचे समाधान झाले नाही तर ते वरिष्ठ न्यायालयात पुन्हा महसुली प्रतिदावा दाखल करतात. तसेच वारंवार महसुली दावे झाल्यामुळे वर्षानुवर्षे सदर दावे चालु राहतात. त्यामुळे महात्मा जोतिराव फुले महसुल लोक अदालतीचे आयोजन करुन दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने महसूली दावा निकाली काढणेकामी संधी देणेत येत आहे.
त्यानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालय, कळंब येथे दाखल असलेले दावे/प्रकरणे हा महात्मा ज्योतिराव फुले महसुल लोक अदालतीत तडजोडीने निकाली काढणेसाठी दि. 07/10/2026 रोजी महसुल लोक अदालतीचे आयोजन करणेत आलेले आहे. तरी पक्षकारांनी या कार्यालयात दाखल केलेले दावे/प्रकरणे लोक अदालतीमध्ये तडजोडीने निकाली काढणेसाठी विहीत नमुण्यातील अर्ज दिनांक 01/10/2026 पर्यंत सादर करुन सदर महसुल लोक अदालतीत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे

Post a Comment
0 Comments