तेरणा काठ वृत्तसेवा --- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ स्थितीची पाहणी केली त्यांनी पाहिले पण मदत जाहीर करण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा मात्र पुर्णपणे फेल झाली आहे.
यावर्षी पावसाने चांगलीच उघड दिल्याने शेतकरी हवालदिल झाला असून शेतात केलेल्या खर्चाच्या तुलनेत एकदम कमी उत्पादन होणार आहे तर बऱ्याच शेतातील पिके वाळून गेली आहेत.केलेला खर्च ही मिळणं धूसर झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा पडणार आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.आता शेतकरी फक्त सरकारी मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहे.परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी दौरा केला त्यांच्या समवेत
पालकमंत्री प्रताप सरनाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील,आमदार बसवराज पाटील, आ. राणाजगजीतसिंह पाटील,आ.कैलास घाडगे पाटील,आ.प्रवीण स्वामी,माजी आमदार ज्ञानराज चौगुले जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,पोलीस अधीक्षक रितू खोखर यांचेसह विविध विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.मलकापूर शिवारातील रामहारी लोमटे यांच्या शेतात सोयाबीन पिकाची पाहणी केली व चोराखळी, येरमाळा,सापनाई, मलकापूर, येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला असता
दुष्काळाची परिस्थिती सरसकट असल्याने मदतही सरसकट देण्यात येणार आहे.मदत देताना कोणतेही आढेवेढे घेतले जाणार नाहीत.पंचनामे कायदेशीर प्रक्रियेनुसार करावे लागतील.मात्र,परिस्थिती सरसकट असल्याने मदतीचा निर्णयही सरसकटच असेल,असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या पक्षांची घोषणाबाजी
धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी जोरदार निदर्शने केली. त्यांच्यासमोर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आधी दुष्काळ जाहीर करा अशी घोषणाबाजी केली.

Post a Comment
0 Comments