Type Here to Get Search Results !

येरमाळा घाटात एसटी बसचा अपघात ;अनेक प्रवासी जखमी.



तेरणा काठ वृत्तसेवा --- येरमाळा घाटात बार्शी आगाराची एसटी बस बार्शीहून कळंबकडे येत असताना येरमाळा घाटात बसचा ब्रेक निकामी झाल्याने ती सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात पलटी झाल्याची घटना गुरुवारी रात्री ( ता. १०) साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बार्शीहून कळंबच्या दिशेने ही बस प्रवाशांना घेऊन येत होती.येरमाळा घाटातील उतारावर बसचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. कांही प्रवाशी खाली उतरले बस मागे जात असल्याने उतरलेल्या प्रवाशांना टायरला दगड लावा म्हणत असताना अंधारात कांही प्रवाशांना अंदाज न आल्याने टायरला उट्या लावता न आल्याने नंतर बस रस्त्याच्या कडेला जाऊन सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात पलटी झाली. अपघातामुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.

दरम्यान, बसच्या मागून येणाऱ्या एका वाहनचालकाने अपघाताची माहिती येरमाळा पोलिसांना दिली. माहिती मिळताच येरमाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. खोल खड्ड्यात पलटी झालेल्या बसमधील जखमी ३५ प्रवाशांनागाडीतील उतरलेले प्रवाशी आणि पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने दोराच्या साहाय्याने खड्ड्यातून बाहेर काढले.जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी चार १०८ रुग्णवाहिकांच्या माध्यमातून धाराशिव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार,काही प्रवाशांच्या हातापायांना गंभीर दुखापत झाली असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.


घटनेची माहिती मिळताच कळंब आगाराचे आगार प्रमुख विजय घोलप, सहायक वाहतुक अधीक्षक बालाजी मुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमीची प्रवाश्यांची, चालक धनवे,वाहक नले यांची विचारपूस  केली.

या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याने मोठा अनर्थ टळला. रात्रीच्या वेळी घाटातील खोल खड्ड्यात बस पलटी झाल्याने बचावकार्यातही अडचणी निर्माण झाल्या.येरमाळा पोलिसांनी तातडीने केलेल्या मदतीमुळे जखमी प्रवाशांना वेळेत उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

Post a Comment

0 Comments