Type Here to Get Search Results !

दहिफळ येथील रोहिणी योगराज पांचाळ यांचा गौरी-लक्ष्मी सजावटीतून सामाजिक शिक्षणाचा संदेश



तेरणा काठ वृत्तसेवा : गौरी-लक्ष्मी उत्सवानिमित्त दहिफळ येथील रोहिणी योगराज पांचाळ यांनी यंदा पारंपरिकतेसोबत सामाजिक आणि शैक्षणिक संदेश देणारी आगळीवेगळी सजावट केली आहे. स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा आरासीत मांडून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले आहे.

गौरी-लक्ष्मीची परंपरा जपत या सजावटीत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. आरासीत विविध पुस्तके, ग्रंथ, खेळणी, फराळाचे पदार्थ तसेच विविध वस्तू आकर्षक पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. विशेषतः सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याची आठवण करून देत मुलांनी शिक्षणाला महत्त्व द्यावे, असा संदेश या सजावटीतून देण्यात आला आहे.

जिजाऊंनी संस्कार आणि स्वराज्याची प्रेरणा दिली, तर सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मोठे कार्य केले. या दोन्ही महान महिलांच्या विचारांचा संगम गौरी-लक्ष्मीच्या आरासीत घडवून आणण्याचा प्रयत्न रोहिणी योगराज पांचाळ यांनी केला आहे.

उत्सवाच्या माध्यमातून केवळ सजावट न करता परंपरा, संस्कार आणि शिक्षणाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणारी ही आरास परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या या संकल्पनेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments