Type Here to Get Search Results !

श्री नृसिंह गणेश मंडळ बाजार चौक येरमाळा यांची कार्यकारिणी जाहीर



तेरणा काठ वृत्तसेवा : श्री नृसिंह मित्र मंडळ, बाजार चौक, येरमाळा यांच्या वतीने यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी श्री नृसिंह गणेश मंडळाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदी . विशाल निळकंठ बारकुल, उपाध्यक्षपदी . तेजस सुरेश बारकुल, सचिवपदी. दीपक राजेंद्र बारकुल, तर कोषाध्यक्षपदी. आतिश अंकुश बारकुल यांची निवड करण्यात आली.

तसेच प्रसिद्धी प्रमुखपदी  महेश बळीराम बारकुल, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुखपदी  कुलदीप सुरेश बारकुल, तर शालेय विद्यार्थी कार्यक्रम प्रमुखपदी. रोहित रामलिंग बारकुल यांची तर.मंडळाच्या कार्यकारिणीत  आकाश तुकाराम बारकुल . गोरख बारकुल, अल्ताफ पठाण,  अविनाश मोरे,  समाधान बारकुल, . गणेश बारकुल,  सचिन बारकुल, प्रसाद बारकुल, . किरण बारकुल आणि श रामेश्वर चौधरी यांंची सदस्य म्हणून समावेश करण्यात आला.

सामाजिक ऐक्य, संस्कृती आणि संस्कार जपणारे मंडळ” या उद्देशाने यावर्षीचा गणेशोत्सव विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांनी साजरा करण्याचा संकल्प मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.गणेशोत्सवादरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिर, शालेय स्पर्धा, नृत्य स्पर्धा तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच समाजामध्ये एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, हा मंडळाचा प्रमुख उद्देश आहे.

 मंडळाचे मार्गदर्शक अमोल बारकुल सर,  कुलदीप बारकुल,  महेश बारकुल. बालाजी जाधव यांनी यावर्षीचा गणेशोत्सव सामाजिक एकता, संस्कृती आणि संस्कारांचा आदर्श निर्माण करणारा ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments