Type Here to Get Search Results !

धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा —डॅा.प्रतापसिंह पाटील



तेरणा काठ वृत्तसेवा : कळंब तालुक्यात खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यांपासून पावसाने मोठी दडी मारली आहे. पावसाअभावी तालुक्यातील बहुतांश भागातील पिके करपून गेली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सोयाबीन सह इतर सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार, कळंब यांच्या वतीने डॅा.प्रतापसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनामध्ये कळंब तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा विचार करून सर्व महसूल मंडळांतील पिकांचे तातडीने संयुक्त पंचनामे करावेत, नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर करून तात्काळ मदत व अनुदान जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली.

तसेच शेतकऱ्यांना खरीप पीक विमा व शासकीय नुकसानभरपाई विनाविलंब मिळावी, वीजबिलाबाबत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कातून माफी मिळावी, गुरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, २०२० सालचा प्रलंबित पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा तसेच २०२३ ते २०२५ दरम्यानच्या प्रलंबित पीक विम्याची रक्कम तातडीने अदा करावी, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.

प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह भैय्या पाटील , कळंबचे तालुकाध्यक्ष प्रा.तुषार वाघमारे, शहराध्यक्ष बाळासाहेब  कथले, जिल्हाउपाध्यक्ष सुरेश निवृत्तिराव टकाळे, सरचिटणीस आत्माराम बिक्कड,चिटनीस भरत शिंदे, सचिव रमेश देशमुख, किसान सेल जिल्हाध्यक्ष औदुंबर धोंगडे, युवक तालुकाध्यक्ष भीमा हगारे, तालुका सचिव वाहेद पटेल, माणिकराव जाधव, पुरुषोत्तम शिंदे, लक्ष्मण  शिंदे,किरण  जाधव,माजी सैनिक सेलचे अच्युतराव  घोंगडे,आनंदा जगताप, महादेव अंबिरकर, लिंबाजी कांबळे,राजेश पाटील, अल्पसंख्यांक सेल जिल्हाउपाध्यक्ष पटेल जिक्राईल, सोशल मिडीया जिल्हा उपाध्यक्ष चेतन ​वाघमारे, शंकर कदम, सामाजिक न्याय विभागाचे बालाजी वाघमारे, युवक जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल  कोकाटे,शंभूराजे महाजन, नारायण तौर, राजाभाऊ भोसले, हनुमंत (बबलु) वाघमारे, निवृत्ती कोकाटे, गणेश वावरे, अमरदीप(बबलु) पाटील, अशोक (सोनु) मोरे , नागनाथ वाघमारे, राहुल माळी,करण यादव,चेतन नेमाणे,किरण पानढवळे, रणजित महाजन, विजयकुमार ठोंबरे, किरण खडबडे,शिवराज पोळ ,बसवेश्वर महादेव भागुडे, समाधान वाघमारे, संकेत घोलप उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments