Type Here to Get Search Results !

प्राचार्य सुनील पाटील यांचा सेवापूर्ती सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गौरव



तेरणा काठ वृत्तसेवा --- ज्ञानोद्योग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येरमाळा येथील प्राचार्य. सुनील शहाजीराव पाटील यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन जिजाऊ मंगल कार्यालय, येडेश्वरी मंदिर रोड येथे २९ ऑगस्ट २०२६ रोजी  करण्यात आले होते. 

या सेवापूर्ती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्ञानप्रसारक मंडळ, येरमाळ्याचे सचिव  अशोक मोहेकर उपस्थित होते. कार्यक्रमाला सहकार परिषद, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजन बाबुराव पाटील उपस्थित होते. आ. कैलास पाटील ,उपाध्यक्ष आबासाहेब बारकुल, ज्ञानप्रसारक मंडळ येरमाळा ,माढा-पंढरपूर विधानसभा आ. आभिजित पाटील , एम.डी. धाराशिव साखर कारखाना युनिट १,२,३ चे अमर धनंजय पाटील , तेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ढोकी प्रा .संजय पाटील पंचायत समिती सदस्य, सौ. वृषाली पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती .

ज्ञानदानाच्या प्रवासात प्राचार्य सुनील शहाजीराव पाटील यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त आणि जीवनमूल्यांची दिशा दिली. त्यांच्या ३२ वर्षांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल आयोजित करण्यात आलेला हा सेवापूर्ती सत्कार सोहळा हा त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याबरोबरच शिक्षण क्षेत्रातील योगदानाची कृतज्ञतापूर्वक दखल घेणारा ठरला. या कार्यक्रमाचे निमंत्रक माजी सरपंच सुभाष शहाजीराव पाटील,  प्रा. अंकुश शहाजीराव पाटील, यशवंत पाटील यांनी आयोजन केले होते., परिसरातील शिक्षणप्रेमी नागरिक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, मित्रपरिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ज्ञानसेवकाचा गौरव वाढवला .

Post a Comment

0 Comments