Type Here to Get Search Results !

महसूल दिनी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे अन् तहसीलदार डॉ. मृणाल जाधव जिल्ह्यात अव्वल



तेरणा काठ वृत्तसेवा ----धाराशिव जिल्ह्याचा महसूल दिन २०२६ मंगळवारी (दि. १८ ऑगस्ट) परंडा येथील राजवीरा लॉन्स, बावची रोड येथे उत्साहात पार पडला. जिल्हाधिकारी श्री. कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात महसूल प्रशासनातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. प्रशासनाच्या कामगिरीला व्यासपीठावर दाद मिळाली आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली.महसूल दिनी दत्तू शेवाळे अन् डॉ. मृणाल जाधव जिल्ह्यात अव्वल! ठरल्या या  गौरव सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे उपविभागीय अधिकारी उमरगा श्री. दत्तू शेवाळे आणि धाराशिवच्या तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी आपापल्या संवर्गात जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले. उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरी, कर्तव्यनिष्ठा आणि महसूल प्रशासनातील योगदानाची दखल घेत दोन्ही अधिकाऱ्यांचा जिल्हास्तरीय गौरव करण्यात आला.

कामगिरीची दखल घेत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासोबतच महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याचा संदेशही या कार्यक्रमातून देण्यात आला.


विविध संवर्गातील उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

शासनाच्या निर्देशानुसार १ ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार धाराशिव जिल्ह्याचा महसूल दिन कार्यक्रम यंदा १८ ऑगस्ट रोजी परंडा येथे आयोजित करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी संवर्गापासून पोलीस पाटील संवर्गापर्यंत विविध संवर्गातील उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरावर गौरव करण्यात आला.

 *उपविभागीय अधिकारी संवर्ग :* 


 *श्री. दत्तू शेवाळे, उपविभागीय अधिकारी, उमरगा.* 


 **तहसीलदार संवर्ग :* 

 *डॉ. मृणाल जाधव,* *तहसीलदार, धाराशिव.* 

 *श्रीमती विशाखा बलकवडे.* 

 *नायब तहसीलदार धाराशिव* 


सहायक महसूल अधिकारी संवर्ग :


श्रीमती मनिषा वाघमारे – जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव.

श्री. रवी मोहिते – उपविभागीय कार्यालय, धाराशिव.

श्री. नितीन भांडवलकर – तहसील कार्यालय, परंडा.

श्री. ए.एन. आडसुळे – तहसील कार्यालय, उमरगा.

श्रीमती विद्या रणदिवे – तहसील कार्यालय, कळंब.


मंडळ अधिकारी संवर्ग :

श्री. श्रीनिवास पवार, श्री. नारायण नागटिळक, श्री. दिपक चव्हाण आणि श्री. विद्याधर कोळी.


महसूल सहायक संवर्ग :

श्री. प्रभाकर गायके, श्री. प्रताप पाटील, श्री. संतोष कऱ्हाळे, श्री. वजीर अत्तार आणि श्री. मंगेश गुरव.


ग्राम महसूल अधिकारी संवर्ग :

श्री. अमोल निरफळ, श्री. गणेश गटकळ, श्री. सुशांत गिरी आणि श्री. कार्तीक भारती.


शिपाई संवर्ग :

श्री. विरेंद्र झाडे, श्री. विक्रम जमादार, श्री. अशोक क्षिरसागर, श्री. आण्णासाहेब नाईकवाडी आणि श्री. रविंद्र नामदेव.


कोतवाल संवर्ग :

श्री. भैरवनाथ माळी, श्री. अरुण जाधवर, श्री. गफुर औटी आणि श्री. आलम ताजोददीन सय्यद.


पोलीस पाटील संवर्ग :

श्री. आण्णासाहेब शिवाजी कोळेकर, श्री. शिवाजी गायकवाड, श्री. तानाजी माटे आणि श्री. रामराजे माने.


वाहनचालक संवर्ग :

श्री. चंद्रकांत पंढरी साळुंके,


 जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव.

६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत पाल्यांचा गौरव

महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंत पाल्यांचाही यावेळी गौरव-सन्मान करण्यात आला.


 अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक यशाची दखल घेत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले.


महसूल कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या शैक्षणिक प्रगतीचा गौरव करण्याचा हा उपक्रम उपस्थितांसाठी विशेष कौतुकाचा ठरला.


योगसाधनेपासून आर्थिक नियोजनापर्यंत विविध उपक्रम

यंदाचा महसूल दिन केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न ठेवता अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मानसिक, आर्थिक आणि शारीरिक आरोग्यालाही प्राधान्य देण्यात आले.


यामध्ये मानस योग साधना मार्गदर्शन, आर्थिक गुंतवणूक नियोजन, पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांची माहिती, हास्यविनोद कार्यक्रम, रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

त्यामुळे महसूल दिनाला केवळ सन्मान सोहळ्याचे स्वरूप न राहता अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या विविध उपक्रमांची जोड मिळाली.


जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे मार्गदर्शन

कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी श्री. कीर्ती किरण पुजार यांनी उपस्थित महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

महसूल विभाग हा शासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा असल्याने नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा लक्षात घेऊन काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी श्री. विद्याचरण कडवकर यांनी केले.


मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील, महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे कार्याध्यक्ष श्री. अनिलजी सूर्यवंशी, एसबीआयचे विभागीय व्यवस्थापक श्री. प्रेमानंद चांदेकर, हास्यविनोदकार डॉ. संजय कळमकर, विभागीय अध्यक्ष श्री. लक्ष्मण नरमवार, तसेच जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, विविध महसूल संघटनांचे पदाधिकारी आणि अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नियोजनबद्ध आयोजन; परंडा तहसील कार्यालयाचे योगदान

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसीलदार पूजा गोरे व संतोष पाटील यांनी केले, तर तहसीलदार परंडा श्री. निलेश काकडे यांनी आभार प्रदर्शन केले.


महसूल दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. विद्याचरण कडवकर व उपविभागीय अधिकारी भूम श्रीमती ज्योती चौहान यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच तहसील कार्यालय परंडा येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

कर्तृत्वाला सलाम; महसूल प्रशासनाला नवी ऊर्जा

उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान, गुणवंत पाल्यांचा गौरव, आरोग्य तपासणी, रक्तदान, योगसाधना, आर्थिक नियोजन आणि मनोरंजनपर उपक्रमांमुळे परंडा येथे झालेला धाराशिव जिल्हा महसूल दिन २०२६ हा प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक ठरला.


विशेषतः उपविभागीय अधिकारी . दत्तू शेवाळे आणि तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी आपापल्या संवर्गात जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविल्याने त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरीला या सोहळ्यात विशेष अधोरेखित करण्यात आले. कर्तृत्वाची दखल घेतली जाते आणि उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान केला जातो, हा सकारात्मक संदेश या महसूल दिनातून जिल्ह्यातील संपूर्ण महसूल यंत्रणेला मिळाला.

Post a Comment

0 Comments