Type Here to Get Search Results !

रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा युवक अध्यक्षपदी येरमाळ्याच्या विकी वाघमारे यांची निवड.



तेरणा काठ वृत्तसेवा --- येरमाळा येथील शासकीय विश्रामगृहात रिपब्लिकन सेनेची बैठक पार पडली.रिपब्लिकन सेनेची जिल्हा बैठक जिल्हाध्यक्ष अनिल हजारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. धाराशिव जिल्हा युवक अध्यक्षपदी येरमाळ्याच्या विकी वाघमारे,यांची तर कळंब तालुका अध्यक्षपदी किशोर वाघमारे आणि धाराशिव शहर अध्यक्षपदी शंकर माने यांची एकमताने निवड झाली. यावेळी जिल्हा महासचिव भाई फुलचंद गायकवाड,गौतम बनसोडे,संपत गायकवाड व सूरज वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments