Type Here to Get Search Results !

येरमाळ्यामध्ये दिव्यांग वारकऱ्यांच्या दिंडीचे स्वागत



तेरणा काठ वृत्तसेवा -- सेवा समर्पण प्रतिष्ठान, यवतमाळ यांच्या संत सूरदास दिव्यांग अंध दिंडीचे येरमाळा गावात उत्साहात स्वागत करण्यात आले. ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात वडार समाज मंडळांनी दिंडीचे स्वागत केले.

येरमाळा येथील दशरथ जाधव यांनी दिव्यांग भाविकांचे पाय धुवून माळा अर्पण केल्या. यावेळी बीडचे तहसीलदार सुहास हजारे, संजय मोहिते,बांगर साहेब यांनीही दिव्यांग वारकऱ्यांचा गौरव केला. ही दिंडी ५२१ किलोमीटरचा पायी प्रवास करत २५ जुलै रोजी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी पोहोचणार असून, दररोज दिव्यांग आणि अंध भाविक दररोज २५ ते ३० किलोमीटरचा प्रवास करत आहेत.दिंडी संयोजक प्रशांत बनगिनवार, अंध गायिका रिमा तोडकर हिचाही विशेष गौरव जाधव कुटुंबाच्या घरासमोर करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments