Type Here to Get Search Results !

पेपरफुटी व बेरोजगारीच्या निषेधार्थ कळंबमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरदचंद्र पवार पक्ष) एल्गार!



 तेरणा काठ वृत्तसेवा -- स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील वाढता भ्रष्टाचार, ऑनलाईन परीक्षा व्यवस्थेचा झालेला बट्ट्याबोळ आणि दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारी याविरोधात आज कळंब येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने व आंदोलन करण्यात आले.

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरुवात झाली. तेथून तहसील कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी व तरुणांनी सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विद्यार्थी व युवकांच्या भवितव्याशी उघडपणे खेळणाऱ्या या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

युवकांच्या हक्कासाठी सुरू झालेला हा लढा केवळ आंदोलनापुरता मर्यादित राहणार नसून, सरकार ठोस निर्णय घेत नाही आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशाराही प्रा. वाघमारे यांनी दिला.यावेळी तालुकाध्यक्ष प्राध्यापक तुषार वाघमारे शहराध्यक्ष बाळासाहेब कथले, ज्येष्ठ नेते रंजीत तात्या बारकुल, मुसंदिक काजी, सुरेश काका टेकळे, बालाजी अल्टे सर, रमेश देशमुख सर, आत्माराम बिक्कड, सलमा सौदागर, सुनंदा भोसले, सुमती तोरसले, चेतन वाघमारे, भरत शिंदे, औदुंबर धोंगडे, आफताब तांबोळी, वाहेद पटेल, राकेश तापकीर विठ्ठल कोकाटे, किरण खोसे, वैजनाथ शेटे, दत्तात्रय तवले, बालाजी वाघमारे, अशोक धोंगडे, समाधान वाघमारे, परमेश्वर करडे, गणेश गुंड, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments