Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या वतीने शेतकरी बाबासाहेब कोकाटे यांचा सन्मान

 


तेरणा काठ वृत्तसेवा --- येरमाळा येथील होतकरू शेतकरी बाबासाहेब राघू कोकाटे यांनी ॲपेरिक्षा'च्या इंजिनपासून शेतीपयोगी यंत्र तयार केले आहे. याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.लोखंडी चाके आणि जुन्या ॲपेरिक्षाचे इंजिन वापरून हे यंत्र साकारले आहे. या यंत्राद्वारे पेरणीसह कोळपणी, कुळवणी सारखी शेतीची कामे सहजतेने करता येतात.कोकाटे हे या यंत्राच्या साहाय्याने खरीप हंगामाची यशस्वी पेरणी करताना कृषी विभागाचे सहायक कृषी अधिकारी संदीप झाडके आणि मदन तांबारे हे येरमाळा-कळंब मार्गावरून जात असताना पाहिले त्यांनी थांबून बाबासाहेब कोकाटे यांच्या या देशी जुगाडाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत कृषी विभागाच्या अधिकृत फेसबुक पेजवर व्हायरल झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी हे यंत्र पाहण्यासाठी गर्दी केली आहे. जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधागावकर  यांनी बाबासाहेब कोकाटे यांच्या संशोधक वृत्तीचे कौतुक करत, त्यांनी तयार केलेल्या बहुउपयोगी पेरणी यंत्राची सविस्तर माहिती जाणून घेतली ,देशी जुगाडातून बहुउपयोगी पेरणी यंत्र बनविणाऱ्या  बाबासाहेब कोकाटे यांचा फेटा बांधून, शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी येरमाळा पत्रकार संघाचे दीपक बारकुल,दत्ता गायके, सुधीर लोमटे, बालाजी रमेश बारकूल, सोमनाथ बारकूल व गोपाळ कोकाटे  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments