तेरणा काठ वृत्तसेवा --- कळंब. तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गंभीरवाडी येथे कार्यरत असलेले उपक्रमशील अभ्यासू शिक्षक श्री महेश पारखे व विश्वास गायकवाड प्राथमिक शाळा खामसवाडी यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या केंद्रप्रमुख परीक्षेमधून जिल्हा परिषद धाराशिव यांच्या वतीने केंद्र लोहटा पूर्व व गौर येथे पदस्थापना झाल्याबद्दल बिक्कड सर मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड व किशोर माळी पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन ढोकी यांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला. याप्रसंगी दैनिक संघर्ष चे तालुका प्रतिनिधी मुख्याध्यापक संभाजी गिड्डे, केंद्रीय मुख्याध्यापक लक्ष्मण लाखे, व्यापारी बबन फाटक, सहशिक्षक हरिभाऊ मोरे, अखिल कुलकर्णी, उत्तम ढेपे, किशोर गायकवाड, अमोल पवार, निशिकांत आडसूळ,रमेश शिंदे,संजय तांबारे, जनार्दन धुमाळे, रमाकंत दिक्षीत, उत्तरेश्वर शिंदे, प्रदिप रोटे,प्रतिश गुरमे,राजेंद्र पवार,शरद देशमुख व शिक्षक वृंद उपस्थित होते. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना नुतन केंद्रप्रमुख महेश पारखे म्हणाले आजपर्यंत विद्यार्थी हे माझे दैवत समजून ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात मी कार्य केलेले आहे. याही पुढे जिल्हा परिषद शिक्षण विभाग धाराशिव यांनी मला दिलेले केंद्रप्रमुख पदाची जबाबदारी मी अगदी निष्ठेने व विद्यार्थी हिताच्या दृष्टीने कार्य करून प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार काम करेल असे मत व्यक्त केले. तसेच नुतन केंद्रप्रमुख विश्वास गायकवाड यांनी माझ्या केंद्रात विविध स्पर्धा परीक्षेचे आयोजन करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनींच्या मदतीने गुणवत्ता विकासाचे कार्य अगदी निष्ठेने व प्रयत्नाने करेल असे मत मांडले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अखिल कुलकर्णी सूत्रसंचालन अमोल पवार व आभार प्रदर्शन प्रदिप रोटे यांनी केले.

Post a Comment
0 Comments