Type Here to Get Search Results !

तुळजापूर तालुक्यातील ०२ कृषि सेवा केंद्रावर कृषि विभागाची कारवाई तर ०६ कृषि सेवा केंद्र परवाने निलंबित



तेरणा काठ वृत्तसेवा ---- खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभुमीवर कृषि विभागाकडून नियमित कृषि सेवा केंद्र तपासणी करण्यात येत असून तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खतांच्या तक्रारीच्या अनुषंगाने अणदूर, नळदुर्ग व होर्टी भागात कृषि सेवा केंद्राची निरीक्षकाद्वारे तपासणी करण्यात आलेली असुन त्रुटी आढळून आलेल्या अणदूर व नळदुर्ग स्थित ओंकार कृषि सेवा केंद्रावरती कारवाई करण्यात आलेली असुन ०२ कृषि सेवा केंद्राचे बियाणे खते व किटकनाशकांचे ०६ परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. तसेच शेतकऱ्यांचे तक्रार असणाऱ्या संबंधित खतांचे नमुने काढून प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहेत. व तुर्तास संबंधित खतास विक्री बंद आदेश देण्यात आलेले आहेत तसेच उर्वरीत कृषि सेवा केंद्राची तपासणी सुरू असुन त्यावरही सुनावणी घेऊन तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.


यानंतर देखील तपासणी सुरुच राहणार असून दोषी विक्रेत्यांवर बियाणे/खते/किटकनाशके कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हयातील खत विक्री केंद्राने शेतक-यांना जादा दराने विक्री करणे, लिंकिंग करणे, साठा रजिस्टर अद्ययावत न ठेवणे, विक्री केंद्र/गोदामात उपलब्ध असलेल्या खताचा साठा याची माहिती भावफलक/दरफलकावर नोंद न करणे, परवान्यात समाविष्ट स्रोताव्यतिरिक्त इतर निविष्ठाची खरेदी विक्री करणे, साठा रजिस्टर ला नोंद नसणे, शेतक-यांना विहीत नमुन्यात पावती न देणे, खरेदी बिले नसणे, परवानामध्ये गोदामाचा समावेश नसणे इ. प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल.



तसेच शेतक-यांनी बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करत असताना अधिकृत परवानाधारक कृषि सेवा केंद्रातूनच कृषि निविष्ठांची खरेदी करावी, खरेदी करताना पक्की पावती घ्यावी. पावतीवर खरेदी केलेल्या निविष्ठाचा संपूर्ण तपशील, विक्रेत्याची स्वाक्षरी असल्याची खात्री करावी. अनुदानित रायासनिक खताची खरेदी केल्यावर विक्रेत्याकडून ई-पॉस मशीनवरील बिल घ्यावे व खरेदी केल्यानंतर खताच्या बॅगवरील किंमत व विक्रेत्याने दिलेले विल तपासून घ्यावे तसेच बियाणे खरेदी केल्यानंतर त्याचे टॅग, वेस्टन, पिशवी व त्यातील थोडे बियाणे हंगाम संपेपर्यंत जतन करुन ठेवावेत. बियाण्यांची पिशवी सिलबंद असल्याची खात्री करावी व त्यावरील अंतिम मुदत पाहून घ्यावी. नामांकित कंपनीचे वियाणे, खते, किटकनाशके खरेदी करावीत.

Post a Comment

0 Comments