Type Here to Get Search Results !

दहिफळ परतापूर रस्ता दुरुस्ती करण्यात यावा अन्यथा ठिय्या आंदोलन



तेरणा काठ वृत्तसेवा -- सार्वजनिक बांधकाम उपविभाग कळंब कार्यालयास दहीफळ नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले असून निवेदनात म्हटले आहे की ,दहिफळ परतापूर रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत तसेच दहिफळ गावालगत असलेल्या नदीच्या पुलावर देखील खूप प्रमाणात मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत आणि पुलावर मोठ्या प्रमाणात भगदाड देखील पडले आहे. या रस्त्यावरून शाळेचे विद्यार्थी ये जा करतात. मुख्य म्हणजे हा रस्ता तालुक्याला जाणारा रस्ता आहे. या कारणाने मोठ्या प्रमाणात या रस्त्याने दहिफळ व परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये जा असते. खड्डे चुकवताना अनेक प्रवासी पडले आहेत व त्यांना दुखापत देखील झाली आहे. रस्त्याला खड्डे पडल्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील खूप वाढले आहे.तरी या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे अन्यथा २२/०६/२०२६ रोजी आम्ही आपल्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे निवेदनात प्रशांत जनक भातलवंडे,सुरेश मते नारायण भातलवंडे , शिवशंकर भातलवंडे ,पोपट पाटील,किरण भातलवंडे, रमेश मते यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Post a Comment

0 Comments