Type Here to Get Search Results !

सुयश प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलचे उद्घाटन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार



तेरणा काठ वृत्तसेवा --- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीचे औचित्य साधून रविवार (ता.३१) श्री गणेश नगर धाराशिव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था कारेपूर ता.रेणापूर जिल्हा लातूर संचलित सुयश प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल गणेश नगर, श्री वामन सिटी धाराशिव येथे उद्घाटन  विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग डॉ. गणपत मोरे, प्राचार्य डायट कॉलेज धाराशिव डॉ. दयानंद जटनुरे उपशिक्षणाधिकारी धाराशिव दिनकर होळकर,   सोमनाथ लांडगे संचालक साई श्रद्धा एज्युकेशन संस्था धाराशिव संस्थेच्या अध्यक्षा सोनाली दिनकर होळकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सुयश प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.


भविष्यातील एक दर्जेदार शिक्षण व गुणवंत विद्यार्थी घडविणारे संकुल म्हणून या स्कूल कडे पाहिले जाते. तसेच या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी व व गणेश नगर भागातील नागरिक उपस्थित होते.


या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनकर होळकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सोनाली होळकर यांनी केले.

--------------------------

Post a Comment

0 Comments