Type Here to Get Search Results !

विद्यानिकेतन विद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे दहावी बोर्ड परीक्षेचा 100% निकाल



तेरणा काठ वृत्तसेवा ---  विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय येरमाळा  शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, संस्कार आणि यशाची उज्ज्वल परंपरा जपणाऱ्या विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय, येरमाळा व विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूल, येरमाळा या दोन्ही शाळांनी इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 2025-26 मध्ये 100% निकाल लावून  यश संपादन केले आहे.  शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभल्यामुळे विद्यालयाने घवघवीत यश मिळविले आहे.

यंदाच्या 10 वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये नंदिनी प्रमोद पाटील व सिद्धांत मारुती बारकुल यांनी प्रत्येकी 98.40% गुण मिळवत संयुक्त प्रथम क्रमांक पटकाविला तर. प्रिया किरण मते हिने 95.20% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला व प्राची प्रशांत थोरबोले हिने 94.40% गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.

तसेच सत्यम हनुमंत माळी (92.50%), सुदर्शन रमेश लकडे (92.20%), श्रद्धा अजित थोरबोले (91.20%) आणि उदय विकास जाधव (90.80%) यांनीही 90% पेक्षा अधिक गुण मिळवत विद्यालयाचा गौरव वाढविला. विद्यालयातून एकूण 8 विद्यार्थी 90% पेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.

🔹 विज्ञान विषयात सिद्धांत मारुती बारकुल यांनी 99 गुण तर नंदिनी प्रमोद पाटील यांनी 97 गुण प्राप्त केले.

🔹 गणित विषयात सिद्धांत मारुती बारकुल यांनी 98 गुण, प्रिया किरण मते यांनी 97 गुण, नंदिनी प्रमोद पाटील व सुदर्शन रमेश लकडे यांनी प्रत्येकी 96 गुण मिळविले.

🔹 हिंदी विषयात सिद्धांत मारुती बारकुल यांनी 99 गुण तर नंदिनी प्रमोद पाटील यांनी 97 गुण प्राप्त केले.

🔹 सामाजिक शास्त्र विषयात नंदिनी प्रमोद पाटील यांनी 97 गुण मिळवून विशेष यश संपादन केले.

या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष  सचिन पाटील, विद्यानिकेतन शाळेचे प्रशासकीय अधिकारी अनिल डोके , माध्यमिक विभागातील  सर्व शिक्षकवृंद, विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सौ. रोहिणी शिंदे  प्राथमिक चे मुख्याध्यापक संजय बांगर  संस्थेच्या सचिव तथा शाळेच्या डायरेक्टर सौ. स्वाती पाटील  यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


Post a Comment

0 Comments