Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रखडलेले काम लवकरच होणार पुर्ण



तेरणा काठ वृत्तसेवा -कळंब तालुक्यातील दहिफळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भातलवंडे वस्ती पर्यंतच्या रस्त्याचे काम अनेक महिन्यापासुन रखडले होते. रस्त्यावर खड्डे पडले होते. धुळ सर्वत्र उडत होती नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत जनक भातलवंडे यांनी ग्रामस्थांच्या सह्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रस्त्याच्या अर्धवट कामा संदर्भात दि.२३/३/२०२६ रोजी निवेदन दिले होते. लवकर रस्त्याचे काम पुर्ण करा अन्यथा दि. १० एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर धाराशिव येथे अंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. दि. १० एप्रिल रोजी दहिफळ येथे प्रशासकीय अधिकारी यांनी भेट दिली. संबंधीत गुत्तेदाराने रस्त्यावर टँकरने पाणी मारले असुन ४ ते ५ दिवसात रस्त्याचे काम सुरु होईल. असे लेखी पत्र दिले आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन होणाऱ्या रस्त्याला आशियाई बँकेच्या अर्थसहाय्य अंतर्गत मंजुर झाले होते. परंतु सदरील अर्थसहाय्य ADB बँकेकडून मार्च महिन्यात २०२६ अधिकृतरित्या मंजुरी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भातलवंडे वस्ती पर्यंतचे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम पावसाळा सुरू होण्याच्या आधी पुर्ण होईल. तरी अंदोलन मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे पत्र आंदोलनकर्ते प्रशांत भातलवंडे व इतर यांना दिले आहे.

Post a Comment

0 Comments