तेरणा काठ वृत्तसेवा --- धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर आज एक भीषण अपघात झाला. मात्र, अपघातानंतर अवघ्या काही मिनिटांतच (गोल्डन अवरमध्ये) प्रादेशिक परिवहन विभागाच्या (RTO) भरारी पथकाने घटनास्थळी धाव घेत तत्परता दाखवल्यामुळे ४ गंभीर जखमींचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
याबाबत माहिती अशी की,, सोलापूर संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गावर TATA punch या गाडीमधून 4 जण प्रवास करत होते. येरमाळा नजिक गाडी आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाला . हा अपघात इतका भीषण होता की वाहनाचा चक्काचूर झाला आणि प्रवासी आत अडकून पडले होते. कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. योगायोगाने याच मार्गावरून आरटीओचे पथक कर्तव्यावर असताना त्यांना हा अपघात दिसला. अपघाताचे गांभीर्य ओळखून वेळ न घालवता आरटीओ अधिकारी मोटार वाहन निरीक्षक प्रसाद पवार आणि वाहन चालक देशमुख यांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ४ प्रवाशांना पथकाने बाहेर काढले, व तत्काळ शासकीय रुग्णालय धाराशिव येथे दाखल केले.

Post a Comment
0 Comments