Type Here to Get Search Results !

येडेश्वरी देवी चैत्र यात्रेसंर्दभात सविस्तर चर्चेनंतर उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांनी प्रत्येक विभागाला दिली जबाबदारी



तेरणा काठ वृत्तसेवा --- येरमाळा येथील महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री.येडेश्वरी देवीची चैत्र पोर्णिमा यात्रा यावर्षी २ एप्रिल ते ७ एप्रिल च्या दरम्यान होणार असुन येडेश्वरी देवी मंदिर परिसरात मंगळवार (ता.२४) जिल्हा प्रशासनाची बैठक पार पडली.सभागृहात पार पडलेल्या यात्रेच्या प्रशासकीय आढावा बैठकीत  उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांनी सविस्तर चर्चा नंतर प्रत्येक  विभागाला जबाबदारी दिल्या

.या बैठकीस उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी तहसीलदार हेमंत ढोकले सहाय्यक गटविकास अधिकारी मनीषा सुकाळे, महामार्ग पोलीस शाखेचे पोलीस उप निरीक्षक काकासाहेब रोडके ,पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव,वैद्यकीय अधिकारी डॉ. सदानंद बिरादार,महावितरण उपविभागीय अभियंता जे.एच.लाडे, शाखा अभियंता परमेश्वर कुटे,रोहियोअभियंता संजय विभुते,पशुधन विकास अधिकारी डॉ.जी बी पवार,डॉ.महेश मोरे,एसटी विभागाचे स्थानकप्रमुख सुरज पायाळ,अभिजीत धाकतोडे,मंडळ अधिकारी एन.डी.नागटिळक, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब बेदरे,संजय आगलावे,माजी पंचायत सभापती विकास बारकुल,पंचायत समिती सदस्य वृषाली पाटील,प्रशासकीय सरपंच प्रिया बारकुल, उपसरपंच गणेश बारकुल यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा राज्यात उघड्यावर होणारी सर्वात मोठी यात्रा मानली जाते. यात्रा २ ते ७ एप्रिल दरम्यान होणार असल्याने प्रशासनाच्या वतीने  यात्राकाळात होणाऱ्या भाविकांची सुरक्षितता,वाहतूक व्यवस्था,लाईटची व्यवस्था,अशा विविध येणाऱ्या प्रश्नावर चर्चा झाली .  आरोग्य विभागाकडून मंदिर परिसरात एक तर आमराई परिसरात एक तर आरोग्य केंद्रात एक बूथ तर वैद्यकीय अधिकारी१९,पर्यवेक्षक १०,आरोग्य सेवक २०,सेविका १०,परिचर १० अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी केल्याचे डॉ. बिरादार यांनी सांगितले.

महावितरण कडून कळंबचे कार्यकारी अभियंता  नरेंद्र रडे व सहाय्यक अभियंता परमेश्वर कुटे यांनी यात्रा काळात २४ तास थ्री फेस सप्लाय चालु ठेवण्यात येईल पर्यायी विद्युत पुरवठा कळंब आणि येडशी साइट सप्लाय तयार ठेवण्यात येईल त्याच बरोबर गावातील डीटीसी दुरुस्ती कामे करून घेऊन यात्रा सुरळीत पार पाडण्यात येईल असे सांगितले.

परिवहन विभागाकडून यात्रा स्पेशल म्हणून धाराशिव विभागाच्या २००,तर लातूर,बीडच्या १५० बसेस ची मागणी केल्याचे कळंब आगारप्रमुख यांनी सांगितले.

पोलिस प्रशासनाचे सपोनि तात्याराव भालेराव यांनी यात्रेला उपविभागीय अधिकारी १,सपोनी १५,पोउपनि ५०,पुरुष पोलिस ४००,महिला २००,होमगार्ड ३५०,महिला होमगार्ड १५० असा तगडा पोलिस बंदोबस्त मागणी केली असल्याचे सांगितले त्याचबरोबर अवैध दारू विक्री रोखण्यासाठी स्वतंत्र स्कॉड, दरोडा प्रतिबंधक पथक यात्रेसाठी मागवत असल्याचे सांगितले .

 येडेश्र्वरी देवीची यात्रा म्हणजे भाविकांची गर्दी करणारी यात्रा असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी या यात्रेचे पावित्र्य जपावे ग्रामस्थांनी सूचना मांडल्या त्यावर उपाययोजना करुन जिल्हा प्रशासनाकडून यात्रा सुरळीत आणि निर्विघ्न पार पाडण्यात येईल असे तहसीलदार हेमंत ढोकले यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments