तेरणा काठ वृत्तसेवा --- कळंब तालुक्यातील दहिफळ येथील छञपती शिवाजी महाराज चौक (चौरस्ता) ते गावांतर्गत भातलवंडे वस्ती येथील रखडलेल्या रस्ताचे काम रखडलं असून कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,दहिफळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भातलवंडे वस्ती या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून गेल्या वर्षापासून चालू असून अद्याप हि ते काम अर्धवट असून अनेक गावकऱ्यांचा व प्रवाशांच्या वाहनाचा अपघात होऊन इजा व हानी झाली आहे. धुळीमुळे अनेक गावकरी परेशान झाले आहेत. तसेच वयवृद्ध व बालकांना दम्याचे आजार उदभवले आहेत. तसेच मोटार सायकल चालकांना खड्यामुळे मणक्याचे आजार उदभवले आहेत. कोट्यावधी रुपयाचे काम असतानाही काम अत्यंत संत गतीने मागील वर्षापासून चालू आहे. या अर्धवट कामामुळे गावातील नागरिकांना रोजच्या दैनंदिन जीवनात नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. तरी संबधित ठेकेदाराला ईस्टीमेट प्रमाणे लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा १० एप्रिल २०२६ रोजी दहिफळ ग्रामस्थ आपल्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल.निवेदनावर प्रशांत जनक मातलवंडे यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

Post a Comment
0 Comments