तेरणा काठ वृत्तसेवा --- श्री.येडेश्वरी देवीचैत्र पोर्णिमा यात्रा १ ते ७ एप्रिल दरम्यान होतं असुन यात्रेच्या स्थानिक व जिल्हा प्रशासनाच्या यात्रेची नियोजनआहे बैठक तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी,कळंब यांच्या अध्यक्षतेखाली ६ मार्चला ग्रामपंचायत कार्यालयात झाली होती. त्यामध्ये गावकऱ्यांनी यात्रेत येणाऱ्या अडचणी विषयी प्रशासनास काय तयारी करावी लागेल याबाबत सूचना केल्या होत्या या सूचनाच्या आधारे येडेश्वरी मंदिरात जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.
येरमाळ्याच्या श्री.येडेश्वरी देवी चैत्र पोर्णिमा यात्रा महोत्सव १ ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडणार असून,यात्रेच्या कालावधीत भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता शांतता, सुव्यवस्था व सुरक्षितता अबाधित राखण्याच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजनाला गती दिली आहे.या अनुषंगाने पोलीस प्रशासन, महसूल, नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा, वीज वितरण, आरोग्य विभाग, ग्रामविकास, अग्निशमन, एसटी महामंडळ, पंचायत समिती, मंदिर व्यवस्थापन समितीच्या संबंधित पदाधिकाऱ्यांना बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बैठकीत वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य सेवा, आपत्कालीन व्यवस्था, दर्शन रांगांचे नियोजन, सुरक्षा बंदोबस्त व शिस्तबद्ध व्यवस्थापन याबाबत सविस्तर चर्चा करून जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत.त्या अनुषंगाने यात्रेच्या दृष्टीने स्थानिक प्रशासन, देवस्थान,आणि जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन सर्व संबंधित कार्यालय प्रमुखांनी वेळेत उपस्थित राहून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, कळंब यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments