तेरणा काठ वृत्तसेवा--- कळंब. तालुक्यातील भोगजी गावचे सुपुत्र दादासाहेब वसंतराव खराटे सहशिक्षक जिल्हा परिषद सोलापूर यांची IBPS ने घेतलेल्या केंद्रप्रमुख परीक्षेत 200 पैकी 162 गुण घेऊन राज्यात ८३ व्या व सोलापूर जिल्ह्यात १ ला क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल भोगजी ग्रामस्थ व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगजी ता.कळंब यांच्यावतीने भव्य दिव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दादासाहेब खराटे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपक्रमशील मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, प्रसिद्ध शिवव्याख्याते उद्योजक श्री महादेव खराटे, गावचे सरपंच बालाजी अडसूळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन खराटे, माजी सरपंच वसंत आबा खराटे, ग्रामस्थ, शिक्षण प्रेमी नागरिक, सत्कारमूर्ती दादासाहेब खराटे सर यांचा मित्रपरिवार,नातेवाईक, सर्वोदय विद्यालय भोगजी मुख्याध्यापक वाघमारे , संस्थेचे सचिव संजय जाधवर , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगजीचे मुख्याध्यापक डॉ शिवाजी चव्हाण व सर्व शिक्षक वृंद, अनुदानित वस्तीग्रहाचे अधीक्षक आप्पा खराटे , राज बिक्कड , अशोक बिक्कड ,सूर्यकांत खराटे ,सायस खराटे, बाबुराव मुंडे व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी श्री दादासाहेब खराटे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगजी यांना साऊंड सिस्टिम भेट दिली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर शिवाजी चव्हाण यांनी केले. याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड व शिवव्याख्याते महादेव खराटे यांनी आपल्या मनोगतातून मेहनतीशिवाय पर्याय नाही असा संदेश देऊन दादासाहेब खराटे यांचे अभिनंदन केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक परमेश्वर बोबडे, कालिदास वनवे, अनंत डोंगरे, दत्तात्रेय जाधवर, पालकर सर यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी विद्यार्थ्यांना आयोजकाच्या वतीने केळी व लेखणीचे वाटप करण्यात आले.

Post a Comment
0 Comments