Type Here to Get Search Results !

येरमाळा येथे मागील दोन दिवसांपासून सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत महावितरणकडून अघोषित लोडशेडींगमुळे ग्रामस्थांत संतापाची लाट



तेरणा काठ वृत्तसेवा --- येरमाळा येथे सायं 6ते रात्री 10 वाजेपर्यंत अघोषित लोडशेडिंग करण्यात येत असल्याने नागरिक, व्यावसायिक तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात परेशानी होत आहे.

याबाबत महावितरण कंपनीला येरमाळा शिवसेनेच्या वतीने  निवेदन देण्यात आले असून निवेदनात म्हटले आहे की, कोणतीही पूर्वसूचना न देता होत असलेल्या वीजपुरवठा खंडित होण्यामुळे दैनंदिन कामकाज विस्कळीत होत आहे. परिक्षेचा काळ असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे .व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. येडेश्वरी देवी चैत्र यात्रा जवळ आल्यामुळे व्यवसायिकांना तयारी करावी लागते ती हीच वेळ आहे. त्यामुळे येरमाळा व परिसरातील अघोषित लोडशेडिंग तात्काळ बंद करून नियमित व सुरळीत वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी राहुल पाटील, लहू बारकुल, सुहास बारकुल ,बालाजी बारकुल, रमेश पवार.  अनिल पवार,  शिवाजी बारकुल, राजन पाटील,विलास थोरबोले, विजय देशमुख, सुरज बारकुल ,मारुती बारकुल, कैलास बारकुल,नदीम मुलानी, तुषार कवडे, विशाल इंगळे,नितीन बारकुल, प्रवीण मोरे, नागेश तोडकरी,बापू जमदाडे, ओम बारकुल, रोहित घेवारे, इरफान सय्यद  विजय खलसे,गणेश मोरे, रंजीत कसबे आदींसह गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.तात्काळ लोडशेडींग बंद करण्यात आले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या.


Post a Comment

0 Comments