तेरणा काठ वृत्तसेवा --- तहसील कार्यालय धाराशिव यांच्या अंतर्गत आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ करजखेडा येथे दि. १७ मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडला. तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीतही कर्म निष्ठा दाखवली.
हाथ फ्रॅक्चर असतानाही त्यांनी शिबिरात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ मार्गदर्शन केले. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थित नागरिक व शेतकरी बांधवांमध्ये त्यांच्याविषयी आदरभाव अधिकच वृद्धिंगत झाला असून, सर्वत्र त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
सदर शिबिराचे उद्घाटनही डॉ. मृणाल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास स्थानिक नागरिक,शेतकरी, निराधार महिला तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरादरम्यान महसूल विभागाच्या विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या, ज्यामध्ये सातबारा उतारे, विविध दाखले, नोंदणीसंबंधित कामे आदींचा समावेश होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळून प्रलंबित कामांना गती मिळाली. शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला, कारण अनेक प्रश्नांचे निराकरण शिबिरस्थळीच करण्यात आले. त्यामुळे महसूल मंडळ करजखेडा येथील नागरिकांनी प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त केले.

Post a Comment
0 Comments