Type Here to Get Search Results !

विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूलमध्ये मिनी ग्रॅज्युएट डिग्री प्रदान कार्यक्रम संपन्न



 तेरणा काठ वृत्तसेवा --- वयाच्या विसाव्या वर्षी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिळणारी डिग्री जर लहानपणी त्याच ड्रेस कोड घालून जर डिग्री प्रदान करण्यात आली तर शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात प्रेम निर्माण होईल या उद्देशाने येरमाळा येथील विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूल यूकेजी मध्ये  हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.



संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील व संचालिका स्वाती पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अनोख्या उपक्रमाने लहानपणीच मुलांना ड्रेस कोड मध्ये डिग्री प्रदान कशी असते तीही शिक्षणक्षेत्रातील उच्चपदस्थ व्यक्तिच्या शुभ हस्ते मिळते याची माहिती लहान वयातच मुलांना कळाली तर शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात गोडी निर्माण होईल. जेणेकरून विद्यार्थी मनात ध्येय ठेवून शिक्षणात चांगली प्रगती करेल या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात निश्चितच एक आशा निर्माण होईल व आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करून स्वतःचे जीवन संपन्न करेल. यावेळी शिक्षणतज्ञ गणेश देशमुख सर, पत्रकार दत्तात्रय गायके, मुख्याध्यापक डोके सर, पालक प्रतिनिधी श्रीराम मैंदाड, यांची प्रमुख उपस्थिती होती,  यावेळी  प्रिया बारकुल, सुषमा जावळे, औदुंबर बेडके, शितल बेद्रे, समाधान गडदे, स्वाती भगत, राजेश बांगर, पूजा तांबडे, अजित तांबडे, शितल मैंदाड, श्रीराम मैंदाड, सुमित्रा बारकुल, कोमल मोरे, हर्षल मोरे, ज्योती लंगडे, शरीफ शेख, आशा पवार, युवराज पवार, धनंजय इंगोले, प्रशांत बांगर, राधा काकडे, प्रशांत काकडे, स्वराज बाराते, कुंदन वाघमारे, स्वाती वाघमारे, पूजा गायके, प्रियंका ताकमोगे, ज्ञानेश्वरी बाराते, सोनाली वनवे, चंद्रकांत कोळेकर, कीर्ती गपाट, अशोक गपाट, अश्विनी कोळेकर, गोरख भगत यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशेण जाधवर, सूत्रसंचालन बावकर मॅडम व रेश्मा गायकवाड मॅडम यांनी तर शेवटी आभार संस्थेचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी मानले.






Post a Comment

0 Comments