Type Here to Get Search Results !

येरमाळा पोलीसांची धडाकेबाज कामगिरी :: गावठी कट्यासह आरोपी ताब्यात



तेरणा काठ वृत्तसेवा --- धाराशिव जिल्ह्यात सध्या अपर जिल्हादंडाधिकारी यांचे शस्त्र व जमावबंदीचे आदेश लागू आहेत असे असतानाही, शुक्रवारी (ता.६) पहाटे पावणेचार वाजेच्या (०३.४५) सुमारास सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर तेरखेडा शिवारातील सूर्या हॉटेलसमोर एक तरुण संशयितरीत्या हत्यार बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे येरमाळा पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. यावेळी आरोपी विकास काळे याच्याकडे अंदाजे २५,००० रुपये किमतीचा एक बेकायदेशीर गावठी कट्टा आढळून आला. पोलिसांनी त्वरित तो कट्टा जप्त केला. (अंदाजे किंमत २५,००० रुपये),एक स्कॉर्पिओ गाडी (क्र.एम. एच.२०७७) एका निळ्या रंगाच्या कॅनमध्ये ३५ लिटर डिझेल (अंदाजे किंमत ३,१८५ रुपये)याप्रकरणी येरमाळा पोलिसांनी आरोपी विकास काळे याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र कायदा कलम ३,२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा (मपोका) कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत  आरोपीला धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले असता एका दिवसाची पोलीस कष्टडी देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments