तेरणा काठ वृत्तसेवा --- महसूल विभागाच्या वतीने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या महसूल विषयक अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी राज्य शासनाने “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान” राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शासन निर्णय दि. १८ फेब्रुवारी २०२६ अन्वये कळंब तालुक्यात मंडळस्तरावर 7 मार्च पासून समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी हेमंत ढोकले यांनी दिली आहे.
या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, तसेच नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करून प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याचा उद्देश आहे. तालुक्यातील एकूण ८ मंडळ स्तरावर समाधान शिबिरे आयोजित करण्यात येणार असून नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन महसूल विषयक प्रलंबित कामे व तक्रारींचे निराकरण करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार हेमंत ढोकले यांनी केले आहे.
कळंब तालुक्यातील विविध महसूल मंडळांमध्ये खालीलप्रमाणे शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे –
येरमाळा मंडळ – ७ मार्च २०२६
मस्सा (खुर्द) मंडळ – १४ मार्च २०२६
शिराढोण मंडळ – २७ मार्च २०२६
नायगाव मंडळ – १० एप्रिल २०२६
मोहा मंडळ – १७ एप्रिल २०२६
गोविंदपूर मंडळ – २४ एप्रिल २०२६
इटकूर मंडळ – ३० एप्रिल २०२६
कळंब मंडळ – ८ मे २०२६

Post a Comment
0 Comments