तेरणा काठ वृत्तसेवा -- कळंब. तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा शाळेतील यावर्षी एन एम एम एस परीक्षेत ज्ञानेश्वरी विकास धावडे,संग्राम लक्ष्मण वायकर , गणेश सावंत, साक्षी अतुल शिंदे हे चार विद्यार्थी पात्र झाले आहेत. या विद्यार्थ्यांना उपक्रमशील शिक्षक
महादेव खराटे, माजी मुख्याध्यापक ऋषिकुमार साबळे व विज्ञान शिक्षिका शिवनंदा स्वामी यांनी मार्गदर्शन केले. या उत्तुंग यशाबद्दल गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, सहशिक्षक तुकाराम कराळे, बलभीम राऊत, स्वयंसेवक बापू हगारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजश्री वायसे ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, शिक्षण प्रेमी नागरिक यांनी अभिनंदन केले.

Post a Comment
0 Comments