तेरणा काठ वृत्तसेवा -- येरमाळा येथील जनहित पतसंस्था गेल्या 22 वर्षापासुन येरमाळा व परिसरामध्ये बॅकींक क्षेत्रात कार्यरत आहे गेल्या 22 वर्षीत संस्था प्रत्येक वर्षात नफ्यात आहे संस्थेचा ऑडीट वर्ग अ आहे संस्थेला सलग ५ व्या वेळस
आर्यन रिव्हरवूड रिसॉर्ट भोर येथे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मुंबई यांच्या कडून दिला जाणारा अतिशय मानाचा दिपस्तंभ पुरस्कार सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयजी जोशी फेडरेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष काका कोयटे डॉ वासुदेव काळे सीईसो सुरेखाताई लावंडे यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा संतोष तौर तहसीलदार डॉ शिवानंद बीडवे वल्लभ माशाळकर ,दत्तात्रय रणसिंग नितीन कवडे यांना स्विकारला
१० कोटी ते ५० कोटी या गटातून छत्रपती संभाजीनगर विभागातून हा प्रथम क्रमांक मिळाला आहे याबद्दल संस्थेचे व्यवस्थापक शिवप्रसाद घेवारे, सर्व संचालक, कर्मचारी यांच्या विश्वासावर हा पुरस्कार मिळाला असल्याने सर्वांचे अभिनंदन केले जात आहे.आहे

Post a Comment
0 Comments