Type Here to Get Search Results !

सरपंच प्रिया बारकुल यांच्या पुढाकाराने.बाजार चौकातील कचऱ्यावर प्रशासनाचा बुलडोझर,



तेरणा काठ वृत्तसेवा --- येरमाळा येथील बाजार चौकातून जाणाऱ्या श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पालखी मार्गाची स्वच्छता मोहीम येरमाळा ग्रामपंचायतच्या वतीने राबविण्यात आली. प्रशासकीय सरपंच प्रिया विशाल बारकुल यांच्या नेतृत्वाखाली ही साफसफाई संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून करण्यात आली.


 दरवर्षी चैत्र पौर्णिमेला श्री येडेश्वरी देवीची पालखी या रस्त्यांवरुन मार्गक्रमण करते. या पवित्र मार्गावर स्वच्छता राखणे आवश्यक असताना, परिसरातील काही नागरिकांकडून सातत्याने पालखी मार्गावर घनकचरा व सुका कचरा टाकला जात असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले होते. ,या ठिकाणी जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने याच ठिकाणी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी जाळीची कचराकुंडी उभारलेली असतानाही नागरिक नियमांचे उल्लंघन करत रस्त्यावरच कचरा टाकत असल्याचे चित्र दिसून येत होते. या मार्गाची दरवर्षी क्षेत्र पौर्णिमेला साफसफाई केली जातेच या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने साचलेला कचरा उचलून परिसर स्वच्छ केला. सिमेंट काँक्रीटने बांधलेल्या पालखी मार्गावर पडलेला घनकचरा हटवून मार्ग मोकळा करण्यात आला. स्वच्छतेमुळे बाजार चौक व पालखी मार्ग  पुन्हा एकदा स्वच्छ व सुशोभित दिसू लागला आहे.

यावेळी प्रशासकीय सरपंच प्रिया बारकुल यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, या ठिकाणी कचरा टाकण्यास मनाई असून, याबाबत लवकरच ‘कचरा टाकल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल’ असा फलक लावण्यात येणार आहे. यानंतरही नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”

स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, कचरा कचराकुंडीतच टाकावा, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. चैत्र पौर्णिमा यात्रेच्या दृष्टीने ही स्वच्छता मोहीम अत्यंत महत्त्वाची असून, येरमाळा ग्रामपंचायत प्राधासकीय सरपंच यांच्या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

Post a Comment

0 Comments