तेरणा काठ वृत्तसेवा --मेहनत, नियोजन आणि विश्वास यांची सांगड घातली तर यश आपोआप पावलांशी येत याचा प्रत्यय जनता विद्यालय, येडशीच्या एनएमएमएस निकालातून पुन्हा एकदा आला आहे. शैक्षणिक वर्ष 2025–26 मध्ये एकूण 83 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी प्रविष्ट घेतली होती. त्यापैकी 2 विद्यार्थी अनुपस्थित राहिले; मात्र परीक्षेला सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल 38 विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करत प्रशालेचा नावलौकिक अधिक उंचावला आहे. विशेष बाब म्हणजे दहा विद्यार्थ्यांनी 100 पेक्षा जास्त गुण मिळवून गुणवत्तेची चमकदार छाप उमटवली आहे. प्रशालेचे प्राचार्य नलवडे सर, उपप्राचार्य कांबळे सर, पर्यवेक्षिका सौ. नाईक-नवरे मॅडम यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, सूक्ष्म नियोजन आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन, तसेच बाह्य स्पर्धा प्रमुख नलवडे एस. एन. यांचे प्रभावी मार्गदर्शन, पालकांचे जागरूक व प्रेमळ पाठबळ आणि विद्यार्थ्यांची जिद्द, शिस्त व अखंड परिश्रम यांचा हा सुवर्ण संगम आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment
0 Comments