Type Here to Get Search Results !

श्री येडेश्वरी चैत्र पौर्णिमा यात्रा 2026 आढावा बैठक 6 मार्च रोजी



तेरणा काठ वृत्तसेवा --- श्री. येडेश्वरी देवी यात्रा महोत्सव सन-2026 नियोजन बाबत आढावा बैठक  दि.6 मार्च रोजी उपविभागीय दंडाधिकारी कळंब यांच्या अध्यक्षतेखाली येरमाळा येथील ग्रामपंचायत प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे 

 ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय, येरमाळा यांचे पत्र दि.24/02/2026 घ्या अनुषंगाने , दरवर्षी प्रमाणे श्री. येडेश्वरी देवी यात्रा महोत्सव सन-2026 यावर्षी दि. 01/04/2026 ते 08/04/2026 या कालावधित होणार आहे. उक्त कालाबंधित यात्रा उत्सव शांततेत व सुव्यवस्थित पार पडावी यासाठी त्याची पूर्वतयारी म्हणुन  उपविभागीय दंडाधिकारी कळंब यांचे अध्यक्षतेखाली दि. 06/03/2026 रोजी सकाळी 11 वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.सदर बैठकीस उपरोक्त सर्व संबंधित कार्यालय प्रमुखांनी ग्रामपंचायत कार्यालय येरमाळा येथे दि. 06/03/2026 रोजी सकाळी 11 वाजता बैठकीसाठी वेळेवर उपस्थित राहावे, बैठकीस गैरहरजर असणा-यांवर योग्य ती प्रशासकीय कार्यवाही अनुसरण्यात येईल याची दक्षता घ्यावी.असे तहसीलदार हेमंत ढोकले यांनी पत्रात नमूद करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments