Type Here to Get Search Results !

रुईभर दत्तनगरात भक्तिभाव, श्रद्धा आणि सत्काराचा दिव्य सोहळा



तेरणा काठ वृत्तसेवा --- धाराशिव जिल्ह्यातील रुईभर  येथील श्री दत्त मंदिर संस्थान, दत्तनगर येथे दत्तभक्तांसाठी अत्यंत पवित्र व अलौकिक असा भव्य कलशारोहण सोहळा व श्री दत्त सप्ताह मोठ्या भक्तिभावात आयोजित करण्यात आला आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून दत्तनामाचा अखंड गजर सुरू आहे.

रविवार, १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भगवान शिव व श्री दत्ताच्या पूजन, याग, आरती व नामस्मरणाने मंदिर परिसरात आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळाली. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेत “श्री गुरुदेव दत्त” व “हर हर महादेव”च्या जयघोषाने वातावरण मंगलमय केले.

या पावन कार्यक्रमाला धाराशिव तालुका तहसीलदार Dr.मृणाल प्रकाश जाधव या आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित होत्या. यावेळी श्री दत्त मंदिर संस्थान रुईभरच्या वतीने प.पू. श्री आप्पा बाबा व शुभश्री विशाल चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.या प्रसंगी आकाश चव्हाण, विशाल भैया चव्हाण, ज्ञानेश्वर निंबाळकर, स्वप्निल कुलकर्णी यांच्यासह अनेक दत्तभक्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.भक्तिभाव, सेवा आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम घडवणारा हा श्री दत्त सप्ताह भाविकांसाठी दैवी अनुभूती देणारा ठरत असून आगामी कलशारोहण सोहळ्याकडे सर्व भक्तांचे लक्ष लागले आहे. या पावन धार्मिक उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्त मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments