तेरणा काठ वृत्तसेवा -- येरमाळा येथे मध्यवर्ती शिवजयंती सोहळा समितीच्या वतीने दि. १९ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत प्रांगणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांत 63 शिवप्रेमींनी रक्तदान केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.. रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अल्पोपहार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.कार्ययक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजयंती सोहळा समितीचे अध्यक्ष शुभम बारकुल, उपाध्यक्ष संकेत बारकुल, सचिव भाऊसाहेब पवार, प्रविण बारकुल, गणेश बारकुल, गणेश पवार, विनोद यादव यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments