तेरणा काठ वृत्तसेवा – कळंब तालुक्यातील मलकापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची नव्याने निवड प्रक्रिया उत्साहात पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी सुधीर लोमटे तर उपाध्यक्षपदी समाधान मते यांची एकमताने निवड करण्यात आली. समितीच्या सदस्यपदी सैलानी शेख, अश्विनी चव्हान, प्रमोद लोमटे, सुधीर पायाळे, वैशाली पायाळे यांची निवड करण्यात आली.
शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी तसेच शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नव्या समितीकडून सकारात्मक कार्य होईल, असा विश्वास ग्रामस्थ व पालकवर्गाने व्यक्त केला. निवडीनंतर अध्यक्ष सुधीर लोमटे यांनी शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक दर्जा व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.
उपाध्यक्ष समाधान मते यांनीही शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने शाळेचा विकास साधण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी मुख्याध्यापक भंडारे बळीराम, शिक्षीका गाडे नंदा, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. नव्या पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.


Post a Comment
0 Comments