Type Here to Get Search Results !

येरमाळा येथे सायबर सुरक्षा जनजागृती' व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 'राष्ट्रीय एकता रॅली'चे आयोजन



  तेरणा काठ वृत्तसेवा -- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त  येरमाळा पोलीस स्टेशनच्या वतीने राष्ट्रीय एकता रॅली'चे आयोजन करण्यात आले.



या रॅलीत  सायबर सुरक्षेचा संदेश देणारे विशेष टी-शर्ट परिधान केले होते. तसेच सायबर सुरक्षा व राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश देणारे डिजिटल बॅनर्स आणि फलक लोकांचे लक्ष वेधून घेत होते. येरमाळा पोलीस स्टेशन ते ब्रिज चौकापर्यंत एकता रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत घोडके, पोलीस उपनिरीक्षक पवार , शेख, जाधव,क्षीरसागर व ठाणे अंमलदार, पोलीस वर्ग ,ज्ञानोद्योग विद्यालयाचे मुख्याध्यापक मोरे सर, शिक्षक चांदणे सर ,शिंदे सर, राठोड सर ,वाघमारे सर, जळकोट सर, देवकर सर ,पेजगुडे सर, कवडे सर,शिरसाट मॅडम तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते.नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना सावधानता बाळगावी, अज्ञात लिंक्सवर क्लिक करू नये आणि कोणत्याही सायबर फसवणुक घडल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे यावेळी सपोनि घोडके यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments