तेरणा काठ वृत्तसेवा -- महाराष्ट्रात नवसाला पावणारी देवी म्हणून सुप्रसिद्ध असणारी श्री येडेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आज रविवार,आश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना करून प्रारंभ झाला. सायंकाळी श्री येडेश्वरी देवीच्या मंदिरात पारंपरिक पद्धतीने मानकऱ्यांच्या हस्ते घटपुजन करून श्री येडेश्वरी देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली.श्री येडेश्वरी मंदिरात मानकरी अमोल पाटील, यशवंत पाटील,यांच्या हस्ते घटस्थापना विधी पार पडला.यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब बेदरे, समाधान बेदरे, विधी पठण करणारे गिरीश कुलकर्णी,यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक पुजारी बांधव व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाच दिवस खेटे घालण्याची परंपरा
नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवसापासून देवीच्या डोंगराला पाच दिवस खेटे घालण्याच्या पारंपरिक प्रथेला सुरुवात होते. पूर्वी भाविकांना खेटा घालण्यासाठी असलेला दीड किलोमीटरचा मार्ग खडकाळ, खपरी आणि कठीण होता. सध्या वनविभागाच्या पर्यटन निधीतून हा खेटा मार्ग रंगबिरंगी पेव्हर ब्लॉक वापरून दोन मीटर रुंदीचा सुशोभित करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण खेटावाटेवर पथदिवे बसवून प्रकाशव्यवस्था करण्यात आली आहे.या प्रथेमध्ये मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात.


Post a Comment
0 Comments