Type Here to Get Search Results !

येरमाळा येथील विद्यानिकेतन विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश

तेरणा काठ वृत्तसेवा --- विद्यानिकेतन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये  शाळांमधील तब्बल 31 विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

 विद्यानिकेतन मराठी उच्च प्राथमिक शाळा, येरमाळा येथील विद्यार्थिनी श्रेया अशोक गपाट हिने 300 पैकी 216 गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले असून, गौरी प्रवीण माळी हिने 212 गुण प्राप्त केले आहेत. तसेच विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूल, येरमाळा येथील यशवंत अमरसिंह डोके याने 192 गुण मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.

यामध्ये  इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा  विद्यार्थी आराध्या ऋषिकेश थोरात, स्वराज सुजित बारकुल,ध्रुवी गोवर्धन गुरव, स्वराली प्रवीण घोंगडे, नित्या नवनाथ तांदळे, मृणाल महेश बारसकर, विश्वराज शिवराज घाडगे, जास्मिन फिरोज शेख, आयान नजीर शेख, स्वराली सुसेन जाधवर, ओंकार अश्रुबा थोरात, प्रीतम सुधीर उंबरदंड, शिवम अमोल शेटे, शिवराज संदीप ढवळे, अर्णव सुधीर जाधवर वैष्णवी मुकुंद साळुंके

 Vidyaniketan International School, Kalamb यशवंत अमरसिंह डोके – 192 गुण, आयुष रामेश्वर भातलवंडे – 176 गुण, प्रांजल अमोल बारकुल – 158 गुण, वेदांत अश्रुबा सुरवसे – 144 गुण, पूर्वा अमोल उमरदंड – 138 गुण

 इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 पात्र विद्यार्थी श्रेया अशोक गपाट – 216 गुण, गौरी प्रवीण माळी – 212 गुण, वैष्णवी सचिन माळी – 164 गुण, प्रणिती विलास जाधव – 160 गुण, केदारनाथ श्रीराम जोगी – 156 गुण, अजिंक्य अभिमन कुटे – 152 गुण, स्वराज विष्णू मडके – 148 गुण, संदेश सुनील घोळवे – 146 गुण, अंजली अश्रुबा ताकमामोगे – 138 गुण, संस्कार किरण मते – 136 गुण

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. सचिन पाटील, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व व्यवस्थापन समिती यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची कठोर मेहनत, पालकांचे सहकार्य तसेच शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन हे महत्त्वाचे घटक ठरले आहेत




Post a Comment

0 Comments