तेरणा काठ वृत्तसेवा --- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचा मान लाभलेल्या धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील वारकरी दांपत्य बाबासाहेब माने पत्नी प्रभावती माने यांचा येरमाळा बसस्थानकात पत्रकार संघ, ग्रामस्थ व ,विठ्ठल भक्तांच्या वतीने उत्स्फूर्तपणे सत्कार करण्यात आला.
आषाढी वारी आमच्या परंपरेनुसार चालू असून ही माझी एकेवीसावी वारी होती.आणि आम्हाला २१ व्या वारीला पांडुरंगाच्या प्रशासकीय पूजेचा मान मिळाल्याने वारी सार्थकी लागल्याचे माने कुटुंबानी समाधान व्यक्त केले.यंदाच्या आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या समवेत माने दांपत्याने विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळला.महापूजेनंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते माने दांपत्याचा विशेष सत्कार करण्यात आला.तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून त्यांना वर्षभरासाठी मोफत प्रवासाचा पासही प्रदान करण्यात आला.
महापूजा व विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन माने दांपत्य एस.टी.ने आपल्या मूळ गावी गौरगावकडे परतत असताना येरमाळा येथील प्रशासक सरपंच प्रिया बारकुल पती विशाल बारकुल यांच्या बसमधून गावाकडे येत असताना सरपंच प्रिया बारकुल यांनी त्यांना आषाढी एकदशी प्रशासकीय पूजेचा मान मिळाल्याने येरमाळा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार घेण्याची विनंती केली बस यात्रा स्पेशल असतातनाही त्यांनी बस चालकांना विनंती करत येरमाळा बसस्थानकात मानकरी वारकरी दांमपत्याच्या सत्कारचे नियोजन करुन सत्कार करण्यात आला.यावेळी अनेक वारकरी, विठ्ठल भक्त व ग्रामस्थांनी त्यांचे पुष्पहार, श्रीफळ देऊन तसेच शुभेच्छा व्यक्त करत स्वागत व सत्कार केला. .


Post a Comment
0 Comments