Type Here to Get Search Results !

येरमाळ्यातील क्रिडाप्रेमी खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कबड्डी मॅटचे लोकार्पण



तेरणा काठ वृत्तसेवा --- . आबाजी पाटील सामाजिक प्रतिष्ठानच्या पुढाकारातून आणि अमोल भैया पाटील व राहुल पाटील ,डॉ. बालाजी आगलावे यांच्या प्रयत्नांतून येरमाळा परिसरातील खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची कबड्डी मॅट उपलब्ध करून देण्यात आली असून, नुकताच या मॅटचा दिमाखदार लोकार्पण सोहळा पार पडला.

येरमाळा रहिवासी सध्या अमेरिकेतील फ्लोरिडा ॲग्रीकल्चरल रिसर्च सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. बालाजी आगलावे यांची प्रमुख उपस्थितीत.त्यांच्या हस्ते फित कापून या मॅटचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी खेळाडूंना बळ देण्यासाठी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. बालाजी आगलावे म्हणाले की, "क्रीडा संस्कृती रुजणे काळाची गरज आहे. येरमाळ्यातील खेळाडूंमध्ये मोठी क्षमता असून, त्यांना योग्य सुविधा मिळाल्यास ते नक्कीच राष्ट्रीय स्तरावर झळकतील. भविष्यात खेळाशी संबंधित कोणतीही गरज भासल्यास मला नक्की सांगा, मी नेहमी मदतीसाठी तत्पर असेन." त्यांनी येरमाळ्यातून राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवण्याचा मानस यावेळी व्यक्त केला.आबाजी पाटील सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक आणि क्रीडाविषयक उपक्रम राबवले जातात. या मॅटमुळे आता स्थानिक खेळाडूंना सराव करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

या कार्यक्रमास प्रतिष्ठानचे अमोल पाटील, विभागप्रमुख राहुल पाटील, गणेश देशमुख, बापू घेवरे, नदीम मुलानी, गणेश बारकुल, अशोक साळुंखे, संतोष जमदाडे, प्रणव बारकुल, आकाश बारकुल, दिनेश बारकुल, प्रितेश बारकुल, गणेश पवार, सचिन पाटील, सोहेल पठाण, किरण कोंथिबिरे, देवानंद बारकुल, विशाल मोरे, अनिकेत पवार यांच्यासह परिसरातील अनेक क्रीडापटू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अनेक वर्षांपासून येरमाळ्यातील खेळाडूंची ही मागणी होती, जी आज पूर्ण झाल्याने खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश देशमुख यांनी केले, तर आभार राहुल पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments