Type Here to Get Search Results !

धाराशिव तहसील कार्यालयाची शासकीय महसूल वसुलीत अव्वल कामगिरी : शासकीय जमीन महसूलात 143.98% तर शासकीय गौण खनिजात 97.66% उद्दिष्टपूर्ती



तेरणा काठ धाराशिव, प्रतिनिधी : आकाश चव्हाण...

सन 2025–26 या आर्थिक वर्षाअखेर (दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत) प्राप्त झालेल्या अधिकृत महसूल वसुली अहवालानुसार, धाराशिव जिल्ह्यातील तहसील कार्यालय धाराशिव यांनी शासकीय महसूल संकलनात उल्लेखनीय, पारदर्शक व कायदेशीर चौकटीत राहून उत्कृष्ट कामगिरी नोंदविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली तसेच तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या सक्षम नेतृत्वाखाली तसेच महसूल चे सर्व कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे ही प्रगती साध्य झाली आहे.महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयित आणि नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे महसूल वसुलीत लक्षणीय वाढ झाली असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा ठसा उमटविण्यात यश आले आहे.


जमीन महसूल (0029) शासकीय वसुलीचा आढावा :

धाराशिव तालुक्यासाठी 600 लाख रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी 863.85 लाख रुपयांची वसुली करण्यात येऊन 143.98% उद्दिष्टपूर्ती साध्य करण्यात आली असून, ही जिल्ह्यातील सर्वोच्च कामगिरी ठरली आहे.या कामगिरीतून धाराशिव तालुक्याने उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल वसुली करून प्रशासनाची कार्यक्षमता अधोरेखित केली आहे.


गौण खनिज (0853) शासकीय महसूल वसुली :

गौण खनिज विभागांतर्गत 1300 लाख रुपयांचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. त्यापैकी 1269.52 लाख रुपयांची वसुली करून 97.66% उद्दिष्टपूर्ती साध्य करण्यात आली आहे. या विभागातही धाराशिव तालुका प्रथम क्रमांकावर राहिला आहे.

धाराशिव तहसील कार्यालयाने शासकीय जमीन महसूल व शासकीय गौण खनिज या दोन्ही विभागांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले आहे. ही कामगिरी प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे प्रतीक ठरत असून, भविष्यातही हीच गती कायम ठेवण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे. तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांचे नेतृत्व महसूल व्यवस्थापनासाठी आदर्श उदाहरण म्हणून पुढे येत आहे.

Post a Comment

0 Comments