तेरणा काठ वृत्तसेवा --- येरमाळा येथील प्रसिद्ध आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवीची चैत्र पोर्णिमा यात्रा यावर्षी २ एप्रिल ते ७ एप्रिल च्या दरम्यान होणार असुन येथील शहीद जवान शंकर बारकुल सभागृहात पार पडलेल्या यात्रेच्या प्रशासकीय नियोजन बैठकीत यात्रेच्या अनुषंगाने विविध विषयांवरील आज झालेल्या चर्चेत ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने प्रशासनाकडून यात्रेचे तगडे नियोजन करण्यात येईल असे उपविभागिय अधिकारी यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस उपविभागीय दंडाधिकारी गणेश शिंदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपभोगीय पोलीस अधिकारी संजय पवार, तहसीलदार हेमंत ढोकले सहाय्य गटविकास अधिकारी मनीषा सुकाळे, ट्राफिक पोलीस निरीक्षक निशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक टी आर भालेराव, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर जे एम सय्यद, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सदानंद बिरादार, महावितरण चे डेप्युटी इंजिनिअर जे.एच.लाडे, शाखा अभियंता परमेश्वर कुटे, बांधकाम अभियंता ए.व्ही. काळे, एमआरजीएस चे अभियंता संजय विभुते, पशुधन विकास अधिकारी डॉ. जी बी पवार, डॉ. महेश मोरे, एसटी विभागाचे स्थानकप्रमुख सुरज पायाळ, अभिजीत धाकतोडे, मंडळ अधिकारी एन.डी. नागटिळक, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त समाधान बेदरे, माजी पंचायत सभापती विकास बारकुल, पंचायत समिती सदस्य वृषाली पाटील, प्रशासकीय सरपंच प्रिया बारकुल, उपसरपंच गणेश बारकुल यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा राज्यात होणाऱ्या मोठ्या यात्रेपैकी मानली जाते ही दि. २एप्रील ते ७ एप्रिल दरम्यान होणार असल्याने प्रशासनाच्या वतीने ग्रामस्थांना येणाऱ्या अडचणी व त्या पद्धतीने नियोजन बैठकीचे आयोजन केले होते .
या बैठकीला गावातील ग्रामस्थ,पुजारी, यांनी मोठया यात्राकाळात होणाऱ्या भाविकांची सुरक्षितता,वाहतूक व्यवस्था, लाईटची व्यवस्था,अशा विविध येणाऱ्या प्रश्नावर उहापोह केला. ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहता
विविध प्रशासकीय विभाकडून यात्रेच्या काळात केल्या जाणाऱ्या उपाययोजने बाबत यात्रा काळात आरोग्य विभागाकडून मंदिर परिसरात एक तर आमराई परिसरात एक तर आरोग्य केंद्रात एक बूथ तर वैद्यकीय अधिकारी१९,पर्यवेक्षक १०,आरोग्य सेवक २०,सेविका १०,परिचर १० अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी केल्याचे डॉ. बिरादार यांनी सांगितले.
महावितरण कडून कळंबचे उपकार्यकारी अभियंता जयंत लाडे व सहाय्यक अभियंता परमेश्वर कुटे यांनी यात्रा काळात २४ तास थ्री फेस सप्लाय चालु ठेवण्यात येईल तसेच तसेच इमर्जन्सी कळंब आणि येडशी साइट सप्लाय स्टँड ठेवण्यात येईल त्याच बरोबर गावातील डीटीसी मेंटेनन्स करून घेऊन यात्रा सुरळीत पार पाडण्यात येईल असे सांगितले.
परिवहन विभागाकडून यात्रा स्पेशल म्हणून धाराशिव विभागाच्या २००,तर लातूर,बीडच्या १५० बसेस ची मागणी केल्याचे कळंब आगारप्रमुख यांनी सांगितले.
पोलिस प्रशासनाचे सपोनि तात्याराव भालेराव यांनी यात्रेला उपविभागीय अधिकारी १,सपोनी १५,पोउपनि ५०,पुरुष पोलिस ४००,महिला २००,होमगार्ड ३५०,महिला होमगार्ड १५० असा तगडा पोलिस बंदोबस्त मागणी केली असल्याचे सांगितले त्याचबरोबर अवैध दारू विक्री रोखण्यासाठी स्वतंत्र स्कॉड, दरोडा प्रतिबंधक पथक यात्रेसाठी मागवत असल्याचे सांगितले .
येडेश्र्वरी देवीची यात्रा म्हणजे उत्स्फूर्त व्यवसायिकांनी,भाविकांनी भरणारी यात्रा असल्याचे त्यांनी सांगुन स्थानिक ग्रामस्थांनी या यात्रेचे पावित्र्य जपावे असे सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी सूचना मांडल्या. यावर लवकरच उपाययोजना करुन याञा यंपन्न करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडुन सांगण्यात आले.

Post a Comment
0 Comments